| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शिवप्रेमी सामाजिक संस्था लोणारे अध्यक्ष रोहित पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या संस्थेच्या वतीने ‘शिवरत्न भूषण पुरस्कार’ वितरण सोहळा नुकताच पार पडला. शिवप्रेमी सामाजिक संस्था गेली दहा वर्ष कार्यरत आहे, संस्थेच्या माध्यमातून विविध यशस्वी उपक्रम आजवर राबविण्यात आलेले आहेत. या वर्षी देखील 2 जानेवारी रोजी रात्री त्याच जल्लोषात कार्यक्रम लोणारे येथे पार पडला.
या प्रसंगी साहित्यिक क्षेत्रातील भरीव योगदाना बद्दल कैलास पिंगळे, पत्रकारिता क्षेत्रातील योगदाना बद्दल वृत्तपत्र छायाचित्रकार / पत्रकार अमोल नाईक, सामाजिक आरोग्य क्षेत्राकरिता डॉ. राजेंद्र हुलवान, गायन क्षेत्रा करिता योगेश काळबेरे, सामाजिक क्षेत्रा करिता प्रसाद ( पिंट्या ) गायकवाड, सौंदर्य स्पर्धा नृत्य दिग्दर्शन क्षेत्राकरिता जयेश पाटील, अभिनय क्षेत्रा करिता अंकिता राऊत, सिनेमेटोग्राफी क्षेत्रा करिता विक्रांत मुंबईकर, नृत्य दिग्दर्शन क्षेत्राकरिता केतन पाटील, क्रिकेट क्षेत्रा करिता महेंद्र म्हात्रे, पंकज जाधव यांना अँड. जयेंद्र गुंजाळ, कैलास पिंगळे आणि रोहित पाटील यांच्या हस्ते शिवरत्न भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
या प्रसंगी जल्लोष संगीताचा ऑर्केस्ट्राचे सादरीकरण करण्यात आले होते सोहळ्याकरिता मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.