काजल साळुंखेची चाचणी शिबिरासाठी निवड

| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |

रायगड जिल्हा क्रिकेट असो.ची गुणवान महिला क्रिकेटपटू काजल साळुंखे हिची निवड महाराष्ट्र महिला वरिष्ठ गटाच्या अंतिम संघ निवडण्यासाठीच्या शिबिरासाठी करण्यात आली आहे. काजल साळुंखे ही महाडची रहिवासी असून, एसबीसी क्रिकेट अकॅडमीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे. रायगडच्या महिला संघासाठी खेळतांना काजल हिने उत्तम खेळाचे प्रदर्शन केले असून, तिने केलेल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर तिची निवड एमसीएच्या निवड चाचणी शिबिरासाठी करण्यात आली आहे. काजल साळुंखे हिचे प्रशिक्षक आवेश चिचकर व अकॅडमीचे अध्यक्ष तथा आरडीसीएचे सहसचिव बशीर चिचकर यांनी काजल हिच्या निवडी बद्दल आनंद व्यक्त केला आहे. या आधी एसबीसी क्रिकेट अकॅडमीची गुणवान खेळाडू रोशनी पारधी हिची निवड महाराष्ट्र महिला क्रिकेट असो.च्या पंधरा, एकोणीस, तेवीस व वरिष्ठ गटाच्या संघात करण्यात आली आहे.रायगड जिल्हा क्रिकेट असो.चे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदीप नाईक यांच्यासह सर्व आरडीसीएचे पदाधिकारी व सदस्य यांनी दोन्ही मुलींचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version