देवीच्या दर्शनासाठी, देवकाठ्या स्पर्धा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
। गडब । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील गडब येथील काळंबादेवीच्या यात्रेत हजारो भाविकांनी हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले, तर यात्रेतील प्रमुख आकर्षण असणा-या देवकाठ्या स्पर्धा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही काळंबादेवीच्या यात्रेत भाविकांची गर्दी होती. सकाळी पारंपारिक पध्दतीने मंत्रपुष्पांजली होवून देवीला अभ्यंग स्नान घालुन विधीवत पुजा करण्यात आली. त्यानंतर सोन्याचा सुशोभित मुकुट रंगीबेरगी कपडे सोन्याच्या मुकुट, अलंकारांनी देवी शृंगारली गेली. तर यात्रेत विविध खेळण्याची दुकाने, मिठाईची दुकाने, शोभेच्या वस्तु, इमिटेशन ज्वेलरीची दुकाने आदि वस्तुची मांडण्यात आली होती, खेळण्याच्या दुकानात लहान मुलांनी गर्दी केली होती व खेळणी खरेदी करण्याचा आनंद लुटत होती, तर इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात महिलांनी गर्दि केली होती तर तरुणवर्ग डीजे व ढोलाच्या तालावर नृत्य करण्यात मग्न होते. तर दुपारी गडब गावातुन काळंबादेवीची पालखी वाजत गाजत मंदिरांत आणण्यात आली नंतर परिसरातील गावातुन वाजत गाजत ग्रामस्थांनी आणलेल्या उंचच उंचचदेवकाठ्या उभारण्यात आल्या या वेळी देवकाठ्या स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरीकांनी गर्दी केली होती. या देवकाठी स्पर्धेत प्रथम क्रमांक जांभेळा ग्रामस्थ, व्दीतीय क्रमांक चिर्बी ग्रामस्थ, तृतीय क्रमांक घाट ग्रामस्थ यांना पारितोषके देण्यात आली. आधुनिक युगातही गावाकडच्या यात्रामध्ये तरुणांचा उत्साह जाणवत होता. अगदी व्यवसाय व शिक्षणानिमित्त बाहेर गेलेल्या तरुणांनी यात्रेत हजेरी लावली होती. तर नवसाला पावणारी काळंबादेवी अशी देवीची ख्याती असल्याने मुंबई-ठाणे येथुन तसेच, परिसरातील भाविकांनी नवस फेडण्यासाठी यात्रेत गर्दी केली होती. तर कांळबादेवीचे मंदिर मुंबई-गोवा महामार्गालगतच असल्याने येथुन जाणा-या पर्यटकांनी देखील यात्रेत हजेरी लावली.