। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील गोवे येथे दि.26, 27 रोजी 50 किलो वजनी गटाचे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कालभैरव अकले महाड संघाने विजेते पद पटकावले. या कबड्डी स्पर्धेत रायगड व ठाणे जिल्ह्यातील 48 संघानी सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील अंतिम सामना कालभैरव अकले महाड विरुद्ध सोमजाई गोवे या दोन संघात झाला. या अटीतटीच्या लढतीत दोन्ही संघाच्या खेळाडूंनी बहारदार खेळ केला. परंतु अखेर कालभैरव अकले महाड संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी संघ ठरला तर सोमजाई गोवे संघ द्वितीय क्रमांक, शिरगांव तृतीय क्रमांक तर रोहा संघ चतुर्थ क्रमांकाचे मानकरी संघ ठरले सर्व विजेता संघाना रोख रक्कम व चषक देण्यात आले.
यावेळी नरेंद्र जाधव,नितीन जाधव, संदीप जाधव, नामदेव जाधव,सुरेश जाधव, शांताराम पवार, पांडुरंग जाधव, रविंद्र जाधव, नितीन जवके, सुरेश जाधव,मनोहर मांजरे, नंदा वाफिळकर,रामचंद्र कापसे,महादेव जाधव,नंदकुमार जाधव,सुभाष वाफिळकर,लक्ष्यूमन दहिबेकर, रामा गुजर,पांडुरंग शिर्के,महादेव मुसळे,शांताराम घरट,पांडुरंग वारकर,अरविंद पवार,लक्ष्यूमन जाधव,शिक्षक जयश महाडिक व असंख्य ग्रामस्थ प्रेक्षक वर्ग यांच्या उपस्थितीत झाले.
या स्पर्धेत मालिकावीर महाड संघाचा प्रथमेश वांद्रे, उत्कृष्ट चढाई रोहा संघाचा हर्ष पाटील,उत्कृष्ट पक्कड गोवे संघाचा अथर्व जाधव यांना देण्यात आले. तर या स्पर्धेत पंच म्हणून मनोज बामणे, निलेश बामुगडे यांनी उत्तम प्रकारे आपली भूमिका बजावली. स्पर्धेचे सूत्रसंचालन निलेश जाधव यांनी केले.