। महाड । प्रतिनिधी
महाड येथील क्रांती भूमी सामाजिक विकास संस्था आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल यांच्या विद्यमाने रविवार (11) डिसेंबर रोजी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह चवदार तळे येथे राज्यस्तरीय भीम गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचे महाड येथील स्पर्धेचे संयोजक गोपाळ कांबळे यांनी कळवले आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गीतातून अभिवादन करण्यासाठी भीमगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी अजय कुमार सर्वगौड, प्रतापराव पाटील, यशवंतराव गायकवाड, व्ही. के जाधव, राजेश गायकवाड, प्रदीप तांबे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेकरिता लहान गट पंधरा वर्षाखाली व मोठा गट पंधरा वर्षात वरील असे ठेवण्यात आले आहेत. स्पर्धे संबधी अधिक माहिती करिता खालील दूरध्वनीवर संपर्क साधावा , त्याचप्रमाणे स्पर्धकांनी आपली नावे 9 डिसेंबरपर्यंत संयोजकांकडे नोंदवावीत. स्पर्धेचे संयोजक गोपाळ कांबळे (9921754068, 8421089637 ), रवींद्र पाटील ( 9527815765), दीपक पाटील (7276127977), नितीन गायकवाड (9421171768 ), शुद्धोधन शेगोकार ( 9922775957) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.