| खांब-रोहा | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील बाहे ग्रामस्थ व गावदेवी बाहे यांच्या वतीने युवा कार्यकर्ते जगदीश थिटे यांच्या 35 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपन्न करण्यात आलेल्या तालुकास्तरीय खुला गट (38+) कबड्डी स्पर्धेत काळभैरव उडदवणे संघाने अंतिम सामन्यात सर्वोत्तम खेळ करीत चषकावर आपले नाव कोरले.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी उपसरपंच ज्ञानदेव भोईर, तालुका कुणबी युवक मंडळाचे अध्यक्ष अनंत थिटे, ग्रा.पं. सदस्य विलास थिटे, कबड्डीपटू घन:श्याम कराळे, हेमंत खरिवले, संतोष शिंदे, संतोष भोईर, राष्ट्रीय पंच जयवंत घरत, मनोहर भोईर, अमोल शिंगरे, दयाराम भोईर आदी प्रमुख मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
कबड्डीप्रेमींचा भरभरून प्रतिसाद लाभलेल्या या कबड्डी स्पर्धेतील उपविजेतेपद सापया वरसगाव या संघाने पटकावले. तर, गावदेवी किल्ला व वाघेश्वर देवकान्हे या संघांना अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत मालिकावीर म्हणून घनश्याम कराळे (उदडवणे), उत्कृष्ट चढाई गणेश सानप (वरसगाव), उत्कृष्ट पक्कड जनार्दन कराळे (उडदवणे), पब्लिक हिरो विष्णू भोईर (देवकान्हे) तर शिस्तबद्ध संघ म्हणून जय बजरंग लांढर आदींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गावदेवी बाहे व ग्रामस्थ मंडळ बाहे यांनी मोलाचे सहकार्य केले.