| गोवे-कोलाड | वार्ताहर |
मौजे देवकान्हे येथे देवकान्हे, बाहे आणि धानकान्हे गावांच्या संयुक्त विद्यमाने गावदेवी देवकान्हे माती बंदर येथे शिवजयंतीचे औचित्य साधून जिल्हा स्तरीय बैलगाडी (छकडा) जंगी शर्यतींचे आयोजन केले होते. अंतिम फेरीत रोहा तालुक्यातील कालभैरव नवखार यांची बैलगाडी प्रथम, द्वितीय त्रिशा खडतर तर देवकान्हे येथील राम शेडगे यांच्या बैलगाडीने तिसरा क्रमांक पटकावला.
उपांत्यफेरीत जनार्दन भोईर, किशोर सावंत, यशवंत थिटे यांच्या बैलगाडीने शर्यत जिंकली. उपउपांत्यफेरीत संतोष गायकर, राज गोवर्धने, राकेश भोईर यांच्या गाडीने शर्यतीत बाजी मारली. स्पर्धेत विजयी होणार्या गाडी मालकाला अॅड. मनोज शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच स्पर्ध्येत गटागटातून सोडण्यात आलेल्या एक हकळणारा ड्रायव्हर बैलगाडी शर्यतमध्ये गट क्रमांक एक- सुयोग मांटे, बाळू आगळे, अजय जाधव. गट क्रमांक दोन- अजित वरणकर, राजू वागले, मैत्री ग्रुप खारापटी. गट क्रमांक तीन- तुषार देशमुख, महेश मगर, आदेश गायकवाड. गट क्रमांक चार- सर्वेश खेडेकर, साधू खेरटकर, समीर जाधव. गट क्रमांक पाच- सनी जाधव, युवराज नाचरे, मोरेश्वर ढेंबे यांच्या बैलगाडीने कमालीची शर्यत जिंकली.
स्पर्धेला बाळकृष्ण बामणे, मंगेश रावकर, चंद्रकांत लोखंडे, दयाराम भोईर, डॉ. श्यामभाऊ संतोष भोईर, भरत कान्हेकर, विनायक खामकर, गणेश पवार, संघटनेचे अध्यक्ष गोवर्धने, गोरख नाईक, यशवंत थिटे, महेंद्र थिटे, राम शेडगे, नामदेव देवकर, विठोबा शेडगे, बाळू आगळे आदी उपस्थित होते.