| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत बचाव समितीचे ॲड. कैलास मोरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शंभर देशी झाडे लावण्याचा निर्धार केला आणि तो प्रत्यक्षात उतरवीला. यावेळी कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्जतच्या प्रसिद्ध अशा कचेरी टेकडीवर वृक्षारोपण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला टेकडीवरच केक कापण्यात आला. त्यानंतर उपगराध्यक्ष संतोष पाटील, अशोक ओसवाल, महेंद्र चंदन, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुशांत पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, माजी नगरसेवक प्रवीण गांगल आदींच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण समारंभाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी चिंच, वड, कडुलिंब, करंज आदी देशी झाडांचे वृक्षारोपण केले.याप्रसंगी उपस्थितांनी ॲड. कैलास मोरे यांच्या कामाच्या पद्धतीचे अनुभव सांगितले. तर काहींनी ऍड. मोरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे दिसतात. त्यामुळे त्यांनी त्यावर आधारित चित्रपटात काम केल्यास ते अभिनेते म्हणून सुद्धा ओळखले जातील. असे सूचित केले. सूत्रसंचालन सुनील गायकवाड यांनी केले. याप्रसंगी दीपक मोरे, सोमनाथ पालकर, ॲड. प्रमोद सुर्वे, विजयकुमार गोखले, भास्कर थोरवे, राकेश देशमुख, सतीश मुसळे, राजीव पवार, शिवाजी श्रीखंडे, अतुल पवार, हर्षल मोरे, भगवान घरत, विजय जगताप, धर्मेंद्र मोरे, लोकेश यादव स्वीटी बार्शी, विद्या वनगे, उषा कुलकर्णी आदी उपस्थित होते.







