| पोलादपूर | प्रतिनिधी |
नगरपंचायत पोलादपूरच्या दुसऱ्या पंचवार्षिक कालावधीत आठव्या महिला नगराध्यक्षांनी अखेर राजीनामा दिल्याने नवव्या नगराध्यक्ष पदासाठी अस्मिता उमेश पवार यांच्या पक्षसंघटनेने निर्धारित केलेल्या संधीसाठी अर्ज दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला. चंद्रकांत कळंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्याधिकारी विनय शिपाई यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर केले. याप्रसंगी मंगेश नगरकर, राजू धुमाळ, मनोज प्रजापती, निलेश अहिरे, सुरेश पवार, सनी सुतार, सोनाली गायकवाड व अन्य माजी नगराध्यक्षा आणि शिवसैनिक उपस्थित होते.







