तीनशेहून अधिक मुलींना मार्गदर्शन
| पनवेल | वार्ताहर |
सायबर गुन्हे रोखण्यासाठी आठवी ते बारावीच्या मुले आणि मुलींसाठी सायबर सिक्युरिटी अवेरनेस याबद्दल निखिल महाडेश्वर आणि संतोष शेटे (पनवेल शहर पोलीस) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जवळपास एकूण 480 विद्यार्थी उपस्थित होते. याच उपक्रमात दुसर्या भागात ‘कळी उमलताना’ नावाचा वयात येणार्या मुलींसाठी डाएट प्लॅन आणि मासिक पाळीच्या वेळी मुलींनी घ्यायची काळजी यावर डॉ. संजीवनी गुणे यांनी माहिती दिली.
यावेळी जवळपास 330 मुलींची लक्षणीय उपस्थिती होती. गुणे मॅडम यांनी उपस्थित मुलींना महत्त्वपूर्ण माहिती दिली. शाळा समितीचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, मुख्याध्यापक श्री. कुंभार, सर्व शिक्षक गण यांच्यासह क्लबचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, सचिव अनिल ठकेकर व रोटरीयन्स आणि अॅनस यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावला. त्याबद्दल सर्वांचे आभार प्रोजेक्ट चेअरमन डॉ. लक्ष्मण आवटे यांनी मानले.