पुणे | प्रतिनिधी |
वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी कालीचरण महाराजविरोधात पुण्यातील खडक पोलीस स्टेशनकामध्येही गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्या पाश्वर्र्भूमीवर कालीचरण महाराजाला पुणे पोलिसांनी रायपूर येथून ताब्यात घेतले. 30 डिसेंबर रोजी छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी खजुराहो येथून कालीचरण महाराजला अटक केली होती. कालीचरण महाराजाला पुण्यातील नातूबाग येथे शिव प्रताप दिनानिमित्त आयोजित भाषणात चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.