कालीचरणला न्यायालयीन कोठडी

रायपूर | वृत्तसंस्था |
महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी अटक केलेल्या हिंदू धर्मगुरू कालीचरणला यायालयीन कोठडीत सुनावली असल्याचे जिल्हा अभियोजन अधिकारी हिना यास्मिन खान यांनी सांगितले प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चेतना ठाकूर यांच्या न्यायालयाने शुक्रवारी कालीचरणला 13 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
पोलीस कोठडीत असलेल्या कालीचरणला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार होतं, मात्र पोलिसांनी चौकशी पूर्ण झाल्याचं सांगत त्यांना न्यायालयात हजर केलं.

Exit mobile version