पनवेल बाजारात कलिंगडाची विक्री तेजीत

| पनवेल | प्रतिनिधी |

वातावरणातील बदल आणि वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे थंडगार फळांना मोठी मागणी निर्माण झाली असून, बाजारात कलिंगडाची विक्री तेजीत आहे. उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक कलिंगड खरेदीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. बीड जिल्ह्यातून येणारे ‌‘सिंबा’ जातीचे गोड व रसाळ कलिंगड पनवेलच्या घाऊक बाजारात दाखल झाले आहे. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार या कलिंगडाला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या घाऊक बाजारात कलिंगडाचा दर सुमारे 40 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला असून मागणी वाढत असल्याने दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर थंड, गोड आणि आरोग्यदायी फळ म्हणून कलिंगडाला प्राधान्य दिले जात असून बाजारात सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी दिसत आहे.

Exit mobile version