| तळा | वार्ताहर |
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे आराध्य दैवत काळकाई (वानस्ते करीण) देवीचा पुनःदर्शन सोहळा प्रतिवर्षीप्रमाणे पौष शुद्ध षष्ठी रविवार, दि.5 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यातील हे जागृत देवस्थान असून, अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे दरवर्षी देवीच्या पुनःदर्शन सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचे पहायला मिळते.
यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रमदेखील पार पडणार आहेत. ज्यामध्ये सकाळी 8 ते 10 षोडशोपचारी पूजा व महाआरती, 9.30 ते 10.30 अल्पोपहार,10.30 ते 11.30 महिलांचे हळदीकुंकू समारंभ, दुपारी 12.30 ते 2.30 महाप्रसाद 3 ते 4 सभा व आभार प्रदर्शन, असे कार्यक्रम पार पडणार असून, भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वानस्ते करीण सेवा समिती अध्यक्ष किरण देशमुख यांच्याकडून करण्यात आले आहे.






