अमेया यार्डमध्ये कलमारला आग

| उरण । वार्ताहर ।

उरण तालुक्यातील बांधपाडा (खोपटा) ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मालाची हाताळणी करणार्‍या अमेया यार्डमधील कलमारला आग लागण्याची घटना गुरुवारी (दि.29) सकाळच्या सुमारास घडली आहे. या आगीत तीन कोटी रुपये किंमतीचा कलमार जळून नष्ट झाल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. जे.एन.पी.ए. बंदरातून देश परदेशात आयात – निर्यात होणार्‍या मालाची साठवणूक या यार्ड मध्ये केली जाते. सदर आगीत कामगार वर्गाला कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. मात्र आग विझविण्याचे साधन तातडीने उपलब्ध होऊ न शकल्याने आगीत करोडो रुपये किंमतीचा कलमार भस्मसात पडला आहे. यासंदर्भात यार्डचे वरिष्ठ अधिकारी राहिल निगम यांच्याकडे संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

Exit mobile version