कलोते ग्रामपंचायत अधिकारी यांनी रोखला बालविवाह

| रसायनी | राकेश खराडे |

ग्रुप ग्रामपंचायत कलोतेचे ग्रामपंचायत अधिकारी निलेश म्हसकर यांनी खालापूर पोलीस, बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि बाल संरक्षण अधिकारी यांच्या समवेत कांढरोली येथील बाल विवाह रोखला.

खालापूर तालुक्यातील कलोते ग्रा. पं. हद्दीतील कांढरोली तर्फे वनखल वाडी येथील रेणुका सुनिल पवार (वय 17) हिचा विवाह मोठे वेणगाव ता. कर्जत या ठिकाणी होणार होता. तसेच विणेगाव दांडवाडी येथील तुषार तुकाराम पवार (वय 20 वर्ष 6 महिने) याचा विवाह विणेगाव बापदेव वाडी येथे विवाह संपन्न होणार होता. मात्र अधिकाऱ्यांनी हळदी सभारंभाच्या दिवशी दोन्ही ठिकाणचे बालविवाह रोखून धरले. तसेच दोन्ही पालकांचे समुपदेशन केले. यावेळी पथकासोबत सरंक्षण अधिकारी दिप्ती रामरामे, महिला व बाल विकास अधिकारी संघमित्रा अंधोरिकर, ग्रामपंचायत अधिकारी निलेश म्हसकर, पोलीस हवालदार बबन धुळे, अंगणवाडी सेविका आदिती मोरे, लता पपेंद्र हिलम, पोलीस पाटील गणेश राजेंद्र दळवी यांनी कार्यवाही केली.

Exit mobile version