। जेएनपीटी। वार्ताहर।
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सिडकोने भेडखळ – करंजा बंदर या नव्याने निर्माण करण्यात आलेल्या द्रोणागिरी नोड परिसरातील रस्त्यावर नारळाची झाडे लावण्याचा व जतन करण्याचे काम 2020-21 या वर्षात हाती घेतले आहे.परंतु सदर झाडांजवळील गवत काढण्याचा ठेका घेणार्या सिडकोच्या ठेकेदारांनी चक्क नारळाची झाडे जाळण्याचे काम केले आहे.त्यामुळे प्रवासी नागरीकांमध्ये संतापाची भावना खदखदत आहे.
द्रोणागिरी नोड परिसरातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सिडकोने द्रोणागिरी नोड परिसरातील रस्त्यांवर विविध प्रकारची झाडे लावण्याचा संकल्प शासनाच्या माझी वसुंधरा ( झाडे लावा झाडे जगवा ) या माध्यमातून हाती घेतला आहे.त्या धर्तीवर सिडकोने भेंडखळ – करंजा बंदर या द्रोणागिरी नोड परिसरातील नव्याने निर्माण करण्यात आलेल्या रस्त्यांवर लाखो रुपये खर्च करून नारळाची झाडे लावण्याचा संकल्प हाती घेतला आहे.






