| रसायनी | वार्ताहर |
पुणे मराठी ग्रंथालय आयोजित पुस्तक परिक्षण स्पर्धेत कादंबरी गटामधील उत्कृष्ट परिक्षणाबद्दल रसायनी येथील खाने आंबिवली गावातील कामिनी सुरेश खाने यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. कामिनी खाने यांनी कादंबरी पुस्तकाच्या केलेल्या परिक्षणामुळे संबंधित पुस्तकाचे अंतरंग वाचकांना सहजपणे उलघडले. पुस्तक परिक्षणाच्या निमित्ताने कामिनी खाने यांनी केलेल्या अभ्यासाचे प्रतिबिंब त्यांच्या परिक्षणात उतरले आहेत. त्याबद्दल त्यांचे पुणे मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष धनंजय बर्वे, कार्याध्यक्ष श्रीकांत देव यांनी अभिनंदन केले.