कंगना ही राक्षसी वृत्तीची बाई आहे; किशोरी पेडणेकर

। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारताला 1947 मध्ये मिळालेलं स्वातंत्र भीक होती असं वक्तव्य करुन वाद निर्माण केल्यानंतर कंगना रणौतने आता महात्मा गांधींवर निशाणा साधला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं असून नव्या वादाला तोंड फोडलं आहे. भारताला 1947 मध्ये मिळालेलं स्वातंत्र भीक होती असं वक्तव्य करुन वाद निर्माण केल्यानंतर कंगना रणौतने आता महात्मा गांधींवर निशाणा साधला आहे. सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना महात्मा गांधींकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही असा दावा करताना दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते स्वातंत्र्य नाही असं म्हणत अहिंसेची खिल्ली उडवली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामला काही पोस्ट शेअर केल्या असून आपले नायक निवडताना विचार करा असा सल्ला दिला आहे. तसंच महात्मा गांधींना सत्तेची भूक होती असंही म्हटलं आहे.
कंगनाच्या या वक्तव्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून संताप व्यक्त केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना कंगनाच्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आलं असता किशोरी पेडणेकर यांनी ही राक्षसी वृत्तीची बाई असल्याचं म्हटलं आहे. भयानक आहे, भयानक आहे, ही राक्षसी वृत्तीची बाई आहे. एकावर एक एकावर एक नीचपणाचा कळस करते, त्यामुळे सकाळी सकाळी या बाईचं नावंही घेऊ नये, असं म्हणत त्यांनी यावर जास्त भाष्य करणं टाळलं.

Exit mobile version