चंदीगड विमानतळावर ड्रामा
| मुंबई | प्रतिनिधी |
नुकतीच भाजपची निवडणूक जिंकलेली अभिनेत्री कंगना रणौतबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. चंदीगड विमानतळावर सीआयएफच्या महिला रक्षकाने कंगना रणौतच्या कानाखाली मारल्याची माहिती समोर आली आहे. सीआयएफच्या त्या माहिला रक्षकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी कंगनाने केली आहे. कंगना रणौत शेतकरी आंदोलनाविरोधात बोलल्याने सीआयएफचे रक्षक संतापले होते त्यामुळे त्यांनी कंगनाच्या कानाखाली मारली अशी माहिती समोर येत आहे.
