अवघ्या अर्ध्या तासात कनकेश्‍वर डोंगर सर

मोटर सायकल घेऊन पोहचला महादेवाच्या द्वारी

| अलिबाग | वार्ताहर |

प्रवास प्रत्येक मानवाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी तर कुणी धोपट मार्गावरुन पळत असतो. तर कुणी नवीन वाटा तुडवत असतो. तर काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो. अशाच एका धेय वेढा तरुण अलिबाग तालुक्यातील सातिर्जे बोबटकरपाडा गावातील साहिल वामन निर्गुण 23 वर्षीय तरुणाने रविवारी दि.4 मोटार सायकल चालवत अर्धा तासात कनकेश्‍वर डोंगर चढून मंदिर परिसरात पोहचला.

कनकेश्‍वर डोंगर हा अलिबाग तालुक्यापासून 13 कि.मी अंतरावर आहे. या डोंगराची उंची जवळपास 385 मीटर असून श्री कनकेश्‍वर देवस्थान आहे. मापगाव गावापासून 750 पायर्‍या पायवाटेन चढून गेल्यावर आपल्याला हे शिवमंदिर आहे. श्रावणात, तसेच एरवी ट्रेकिंग करणार्‍यांची संख्याही अधिक असते. भल्या भल्यांना या डोंगरावर चढण्यासाठी दिड ते दोन तास लागतात. त्याच ठिकाणी हा आवली अवघ्या अर्ध्या तासात आपली दुचाकी घेऊन पोहचून एक विक्रमच केला आहे.

सातिर्जे बोबटकरपाड्यातील साहिल निर्गुण हा व्यवसायाने दुचाकी मेकॅनिक आहे. तसेच तो बायकर असून अनेक ठिकाणी ट्रेकिंगला जात असतो. लहानपासून कनकेश्‍वर डोंगर मोटार सायकलद्वारे चढून जाण्याचे त्याचे स्वप्न होते. ते स्वप्न त्याने प्रत्यक्षात साकारले आहे. त्यादृष्टीने साहिलने हिरो होंडा मोटार सायकल मोडीफाय करून घेतली होती. तसेच कनकेश्‍वर डोंगर चढण्या आधी त्याने सिध्देश्‍वर डोंगराव कसून सराव केला.

रविवारी (दि.4) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पायथ्यापासून मोटार सायकल पायर्‍यावरून चालविण्यास सुरुवात केली. तीस मिनिटात साहिल हा मोटार सायकलने कनकेश्‍वर मंदिर परिसरात सुखरूप पोहचला. त्याला या कामी त्या मित्र हितेश घाटे याचे मोलाचे सहकार्य मिळाले. त्या धडसी प्रवसाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Exit mobile version