। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताचे एकदिवसीय विश्वचषक 1983 चे विजेते कर्णधार कपिल देव यांनी रोहित आणि विराटचे नाव घेत मोठे वक्तव्य केले आहे. यापवेळी कपिल देव म्हणाले की, रोहित शर्मा विराट कोहलीप्रमाणे कधीही उड्या मारत नाही आणि त्याला त्याच्या मर्यादा माहित आहेत. मला वाटते की, रोहित शर्माला त्याचा खेळ आणि त्याला काय करायचे आहे, हे माहित आहे. रोहितपेक्षा चांगला कोणी नाही. अनेक मोठे खेळाडू येतात आणि स्वत:साठी खेळतात. पण, रोहित एक पाऊल पुढे आहे, तो संपूर्ण संघाला सोबत घेऊन जातो आणि संघातील सर्व खेळाडू त्याच्यावर खूश असतात.