| पनवेल | प्रतिनिधी |
करंजाडेत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी चार पक्षांचे कार्यकर्ते यांनी करंजाडे ग्रामपंचायत हद्दीत माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, सदस्य हे प्रत्येक घरात जाऊन महाविकास आघाडीमधील घटक पक्षाचे कार्यकर्ते यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यामधे शेकाप शहर अध्यक्ष योगेश राणे, संदिप चव्हान, निलम भगत, मंगेश बोरकर, दिपक कूदग, संदिप नागे, केतन आंग्रे, उमेश भोईर, माधवी मॅडम, बिना शहारे, स्वप्नील सकूपाळ, किरण कांबळे श्ृती दिवेकर, प्रितम फडके, महेंद्र गायकर, रमेश आंग्रे, विजय सोनार, नसिम शेख, सुवित्ता झिंझाडे, चैतना भोईर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
पनवेल तालुक्यासह करंजाडे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच, शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करंजाडे वसाहत व गावामध्ये प्रत्येक मतदाराच्या घरात पोहचून उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांची पत्रके देऊन मतदान करण्याचे आवाहन करण्याचे काम जोरात सुरु आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराची सुरुवात (दि.25) एप्रिलपासून झाली. महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्ष यांचे पदाधिकारी यांनी करंजाडे वसाहतीमध्ये येथील प्रचार सुरु केला. यावेळी मतदारांनी महायुतीचे उमेदवार कधीही येथील समस्याकडे दुर्लक्ष व केंद्रात कोणतीही दखल घेतली नाही, त्यामुळे करंजाडे वासियाचा कौल वाघेरे यांना मिळेल, असा विश्वास माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी प्रचारा दरम्यान व्यक्त केला.