बिगारी कामगारांचे पाळणा घर

साडीचा तयार करतात पाळणा
। कर्जत । प्रतिनिधी ।
इमारतीवर बिगारी काम करणारे जोडपे कामावर आल्यावर त्यांना पाळणाघर न परवडणारे असते. ते आपली मुले घेवून इमारतीवर बिगारी काम करायला येतात, काम करायला लागल्यावर आपले मूल कुठे ठेवायचे तर इमारतीच्या आवारात सावली व योग्य जागा निवडून त्या ठिकाणी साडीच्या आधारे पाळणाघर तयार करतात व आपले मूल त्यामध्ये ठेवून काम करतात.
नोकरी निमित्त पालक बाहेर जातात त्यांची मुले सुखरूप राहावीत त्यांचा सांभाळ व्हावा म्हणून ती पाळणा घरात ठेवली जातात, त्यामुळे पाळणाघर ही संकल्पना उदयास आली, सायंकाळी आई वडील कामावरून आली की ते आपल्या मुलांना घरी घेऊन जातात. परंतु बिगारी कामगारांना आपली मुले पाळणाघरात ठेवणे शक्य नसते. त्यामुळे ते कामगार जेथे जातात तेथेच साडीचा पाळणा करून आपल्या मुलाला तेथे ठेवतात.
असेच कर्जत शहरात एका इमारतीचे काम सुरू आहे याठिकाणी साडीच्या माध्यमातून तयार केलेले पाळणाघर त्यामध्ये आपल्या मुलाला ठेवून बिगारी काम करताना दिसत आहे.

Exit mobile version