कर्जत पालिका सभेत कचरा, अनधिकृत बांधकामावरुन खडाजंगी नगरसेवकांचा प्रशासनावर संताप

| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत नगर परिषदेची यावर्षीची सर्वसाधारण स सभेमध्ये कचरा, अनधिकृत बांधकाम तसेच नगर परिषद प्रशासनात नगरसेवकाच्या पत्राला किंमत नसल्याने त्याच विषयांवर वादविवादात गरमा गरम वातावरणात ही सभा पार पडली. सभा नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित करण्यात आली होती. सभेस उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, भारती पालकर,सुवर्णा निलधे, शरद लाड, विवेक दांडेकर, विशाखा जिनगरे, प्राची डेरवणकर, नितीन सावंत, बळवंत घुमरे, संचिता पाटील, पुष्पा दगडे, सोमनाथ ठोंबरे, राहुल डाळिंबकर, मधुरा चंदन, स्वामिनी मांजरे, उमेश गायकवाड, संकेत भासे, हेमंत ठाणगे उपस्थित होते.


विषयपत्रिकेवर एकूण बावीस विषय ठेवण्यात आले होते, प्रथम मागील सभेचे कार्यवृत्त वाचून कायम करण्यात आले. त्यानंतर विषय पत्रिकेवर असलेले विषय नंबर 8 ते 14 हे सर्व विषय स्वच्छ सर्वेक्षण यावर असल्याने उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांनी ह्या विषयांवर माझा आक्षेप आहे ह्या विषयाचे बजेट मोठे असल्याने प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे, त्यासाठी विशेष सभा घेऊन त्यावर चर्चा करावी अशी मागणी सभागृहात केली. या मागणीस नगरसेवक बळवंत घुमरे यांनी पाठिंबा दर्शविला.त्यावर नगराध्यक्ष सुवर्णा जोशी दोन तीन दिवसांनी पुन्हा सभा घेतली जाईल असे सांगितले. स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये सहभाग नोंदवून घेण्याबाबत विषयावर चर्चा करताना सर्वेक्षण च्या स्पर्धेत उतरताना त्यासाठी नगरपरिषद हद्दीत भिंती रंगविल्या जातात, शौचालयाची दुरुस्त केली जाते मात्र त्याकडे पुन्हा लक्ष दिले जात नाही असे राहुल डाळींबकर यांनी लक्ष वेधले. यावरुन नितीन सावंत, सोमनाथ ठोंबरे आदींनी विविध उपप्रश्‍न उपस्थित केले.त्यावर नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी भिंती रंगवताना संबंधित प्रभागातील भिंतींची यादी काढून सर्व नगरसेवक यांना विश्‍वासात घेवून काम करावे असे सांगितले.


सार्वजनिक शौचालय स्वच्छ नाहीत तसेच काही शौचालय यांना सेफ्टी टँक नाहीत त्यांचा मैला हा बाजूच्याच गटारात सोडला जातो याकडे राहुल डाळींबकर यांनी लक्ष वेधले. त्यावर मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांनी शहर अभियंता यांनी जाऊन स्वतः पाणी करून त्याचा अहवाल द्यावा असे सांगितले. नगरसेवक बळवंत घुमरे यांनी मुख्याधिकारी तुम्ही बाजारपेठेत, नगर परिषद हद्दीत फिरले पाहिजे तुमचा कर्मचारी वर्गांवर वचक नाही असे सांगितले. त्यावर राहुल डाळींबकर यांनी मुख्याधिकारी तुम्ही नगरसेवकां बरोबर फिरा मग तुम्हाला बाजारपेठेतील, नगरपरिषद हद्दीतील समस्यां माहिती होतील. नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी आरोग्य विभाग,पाणी विभागाच्या कर्मचारी यांना समस्या बाबत फोन करतो मात्र ते फोन उचलत नाही हे बरोबर नाही.त्यावर नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी कर्मचार्‍यांना फोन उचल्याण्याच्या सूचना केली. राहुल डाळींबकर यांनी ज्या-ज्या विभागाचे कामे आहेत त्या-त्या विभागाच्या सभापतींना याबाबत माहिती देणे गरजेचे आहे, मात्र कळवले जात नाही याबाबाबत सभागृहात नाराजी व्यक्त केली. स्वामिनी मांजरे यांनी बाजारपेठेची परिस्थिती भयानक आहे, सर्वसामान्य नागरिकाला बाजारपेठेमध्ये चालता येत नाही.अनेक ठिकाणी अतिक्रमण झाली आहेत यांकडे नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष नाही. तसेच नगर परिषद क्षेत्रात कोपरा गार्डन बनवण्याचे काम सुरू आहे. त्या दगडाची गुणवत्ता तपासावी अशी मागणी केली.राहुल डाळींबकर यांनी अतिक्रमणे का हटवली जात नाहीत अतिक्रमण हटाव ठेकेदाराच्या ठेक्याला मंजूर आहे मग कसल्या महूर्ताची वाट बघताय असा प्रश्‍न उपस्थित केला.


गटनेते शरद लाड यांनी प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डात कामे करण्यासाठी नगर परिषद फंडातून निधी द्यावा अशी मागणी केली.नगरपरिषद क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे हा विषय चर्चला आला त्यावर मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी नगरपरिषद क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचे चावा घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्याचा बंदोबस्त करणे याबाबत नगरसेवकांनी नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.नगरपरिषदेकडे व्हेटरनरी डॉक्टर, प्रशिक्षित कॅचर सभेच्या चर्चेत राहुल डाळींबकर, नितीन सावंत,अशोक ओसवाल, सोमनाथ ठोंबरे, बळवंत घुमरे, शरद लाड,स्वामिनी मांजरे, संकेत भासे, मधुरा चंदन, सुवर्णा निलधे,संचिता पाटील सहभाग घेतला.

Exit mobile version