कर्जत । प्रतिनिधी ।
उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खेरी येथील हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना तातडीने आपल्या पदावरून हटवावे आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्राला अटक करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सत्ताधारी विकास आघाडीने सोमवारी (दि.11) ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. महाराष्ट्र बंदच्या हाकमध्ये कर्जत व्यापारी फेडरेशन सामील झाले होते. त्यांनी आपली दुकाने बंद ठेवून घटनेचा निषेध केला आहे.