| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील दोन नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून, दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या 10 नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. कर्जत नगरपरिषदेची 21, तर माथेरान नगरपरिषदेच्या 20 जागांसाठी आणि थेट नगराध्यक्षपदासाठी ही सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील क वर्ग दर्जाची कर्जत नगरपरिषद आहे, तर माथेरान गिरीस्थान नगरपरिषद ही पर्वतीय नगरपरिषद आहे. या दोन्ही नगरपरिषदा यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या दोन्ही नगरपरिषद निवडणुका यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर असून, उद्या 10 नोव्हेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरु होत आहे. उद्या सोमवार 10 नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून 17 नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत नामांकन अर्ज भरता येणार आहेत. कर्जत नगरपरिषदेसाठी थेट नगराध्यक्ष आणि दहा प्रभागांतून 21 सदसय निवडून देण्यासाठी निवडणूक होणार आहे. त्यात थेट नागरध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव असून, 11 सदस्यांमध्ये 11 सर्वसाधारण तर तीन अनुसूचित जाती आणि एक अनुसूचित जमाती तर नागरिकांचा मागासप्रवर्गसाठी पाच जागा यांचे आरक्षण आहे. महिला आरक्षण पन्नास टक्के आहे. कर्जत नगरपरिषदेसाठी 29,957 मतदार असून, दोन डिसेंबर रोजी मतदानासाठी 37 मतदान केंद्रे उभारली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. धनंजय जाधव यांनी दिली आहे.
माथेरान या गिरिस्थान नगरपरिषदेसाठी थेट नगराध्यक्ष आणि दहा प्रभागांतील 20 सदस्य निवडण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. माथेरान पालिकेच्या निवडणुकीसाठी 4055 मतदार असून, पर्वतीय नगरपरिषद 100 हून अधिक वर्षे जुनी नगरपरिषद आहे. या नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण आरक्षण असून, दहा प्रभागांतील 20 सदस्यांसाठी अनुसूचित जातीसाठी तीन जागा, तर अनुसूचित जमातीसाठी एक, तर नागरिकांचा मागासप्रवर्ग पाच आणि 11 जागा या सर्वसाधारण असणार आहेत. माथेरान शहरात दहा प्रभागांत निवडणूक होणार असून, त्यासाठी दहा मतदान केंद्र असणार आहेत.







