कर्जत नगरपरिषद हद्दीतील; विविध विकासकामांचे भूमीपूजन


| कर्जत | वार्ताहर |

कर्जत नगरपरिषद हद्दीतील विविध विकासकामांचा भूमीपीजन व लोकार्पण सोहळा नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व नगरसेवक संकेत भासे यांच्या हस्ते पार पडला.

कर्जत नगरपरिषद हद्दीतील एचपी पेट्रोल पंप समोरील वाडी ते विशाल बैलमारे यांच्या घरापर्यत रस्ता व गटारे तयार करणे, कर्जत नगरपरिषद हद्दीतील साईनगर येथे पाण्याची टाकी बांधणे,कर्जत नगरपरिषद हद्दीतील मौजे दहिवली येथील नाला खोलीकरण करणे, कर्जत नगरपरिषद हद्दीतील बामचा मळा येथे गणेश घाट बांधणे, कर्जत नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र. 4 मधील इंदिरानगर येथील मिस्ट बिल्डींग गेट ते साई मंदिर नाल्यापर्यत गटार व स्लॅब बनविणे, कर्जत नगरपरिषद हद्दीतील दहिवली येथील कोकण आळी ते राकेश कडू यांच्या घरापर्यत रस्ता व गटार तयार करणे, कर्जत नगरपरिषद हद्दीतील दहिवली लगत उल्हास नदी काठी घाट सुशोभिकरण करणे, कर्जत नगरपरिषद हद्दीतील गुरव आळी येथील अंतर्गत रस्ता तयार करणे या विकासकामांचे भूमीपीजन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक राहुल डाळींबकर, बळवंत घुमरे, नगरसेविका प्राची डेरवणकर, सुवर्णा निलधे, पुष्पा दगडे, वैशाली मोरे, अभिषेक सुर्वे, नदीम खान, दिनेश कडू, सचिन भोईर, हर्षल मोरे, विशाल बैलमारे, नितीन शिंदे, हर्षद जाधव, सौरभ केदारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version