| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी लागला. परिवर्तन विकास आघाडीच्या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पुष्पा दगडे यांनी विजय संपादन करून आपल्या 13 शिलेदारांसह कर्जत नगरपरिषदेवर सत्ता स्थापन केली आहे. औपचारिकता म्हणून कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षाचा पदभार स्वीकारला. कर्जत नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्ष पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगराध्यक्ष पुष्पा दगडे यांनी पदभार स्वीकारला.यावेळी खासदार सुनील तटकरे, नितीन सावंत, नगराध्यक्ष पुष्पा दगडे, बंधू पाटील, सुवर्णा जोशी नमिता घारे, शेकाप नेते विलास थोरवे, रंजना धुळे, दिपक श्रीखंडे आणि परिवर्तन विकास आघाडीचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आदी मान्यवर उपस्थिती होते. यावेळी अशोक भोपतराव यांनी प्रास्तविक केले. नितीन सावंत यांनी परिवर्तन विकास आघाडीला बहुमत दिल्याबद्दल कर्जतकरांचे आभार मानले.





