कर्जत राष्ट्रवादी फुटीच्या वळणावर

सुरेश लाड वेगळी वाट धरणार

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता चिघळत चालली असून, त्याचे पर्यवसान फुटीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. माजी आ. सुरेश लाड हे वेगळी वाट धरणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. सुरेश लाड पक्ष नेतृत्वाकडून सातत्याने डावलले जात असल्याने ही नाराजी वाढली असल्याचे बोलले जाते. गेल्याच महिन्यात झालेल्या बैलगाडा स्पर्धेच्यावेळीही खा. सुनील तटकरे यांनी माजी जि.प.उपाध्यक्ष सुधाकर घारे यांचे कौतुक करताना लाड यांचे एकदाही नाव आपल्या भाषणात घेतले नाही आणि त्यांच्याकडे जाण्याचे देखील टाळले होते. त्यामुळे लाड यांनी आता आर या पार अशी भूमिका घेण्याचं निर्णय घेतला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.ते आगामी काही दिवसात वाट धरत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. लाड सत्तरीकडे झुकलेले असताना कोणत्या पक्षाकडे प्रवास सुरु आहे याची चर्चा कर्जत आणि खालापूर तालुक्यात रंगू लागली आहे.

Exit mobile version