कर्जत पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले;आरक्षण जाहीर

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत पंचायत समितीच्या 12 जागांसाठी आरक्षण सोडत गुरुवारी (दि.28) काढण्यात आली. मार्च 2022 मध्ये मुदत संपल्याने प्रशासक लागलेल्या कर्जत पंच्यात समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली होती. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका पंचायत समितीच्या 12 गणमधील सदस्यांची निवड करण्यासाठी आरक्षण सोडत काढली.

कर्जत येथील भात संशोधन केंद्राच्या सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढण्यात आली. यावेळी कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख, कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम साबळे यांच्यासह नायब तहसीलदार, निवडणूक नायब तहसीलदार उपस्थित होते.

कर्जत पंचायत समितीमध्ये 12 गण असून त्यात कळंब, पोशीर, पाथरज, कशेळे, नेरळ, शेलू, उमरोली, दहिवली तर्फे वरेडी, सावेळे, पिंपळोली, बीड बुद्रुक आणि वेणगाव असे गण आहेत. सोडत पद्धतीने आणि यापूर्वीचे आरक्षण लक्षात घेऊन हि सोडत काढण्यात आली. आठ वर्षाच्या शाकिब उल हसन या बालकाच्या हस्ते सोडत काढण्यात आली.

आरक्षण सोडत पुढिलप्रमाणेः
कळंब -अनुसूचित जमाती राखीव
पोशीर-सर्वसाधारण महिला राखीव
पाथरज -सर्वसाधारण
कशेळे-अनुसूचित जमाती
नेरळ-नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला राखीव
शेलू-सर्वसाधारण
उमरोली-नागरिकांनाचा मागासप्रवर्ग
दहिवली तर्फे वरेडी-सर्वसाधारण,
पिंपळोली-नागरिकांनाचा मागासप्रवर्ग महिला राखीव
सावेळे-सर्वसाधारण
बीड बुद्रुक-अनुसूचित जमाती महिला राखीव
वेणगाव-सर्वसाधारण

Exit mobile version