कर्जत परिषदेचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार

। कर्जत । वार्ताहर ।

कर्जत नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2021-22 मध्ये ही चमकदार कामगिरी केली असून स्वच्छता अभियानाच्या विजेत्यांमध्ये समावेश झाला आहे. याबाबत 1 ऑक्टोबरला राष्ट्रपतींच्या हस्ते होणार्‍या बक्षीस वितरण समारंभाचे आमंत्रण नगरपरिषदेस प्राप्त झाले आहे.

इंडियन स्वच्छता अभियानाची केंद्र शासनाने दखल घेतली असून त्या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचे आमंत्रण कर्जत नगर परिषदेस प्राप्त झाले आहे.

परिषदेच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणच्या चौकात भिंती तयार करून त्यावर चित्र काढून स्वच्छतेची जनजागृती करण्यात आली होती. तसेच चौकामध्ये कोपरा गार्डन तयार करण्यात आले असून त्याठिकाणी स्टॅच्यु उभारण्यात आले होते. या कामगिरीची दखल केंद्र शासनाने घेतली. या स्पर्धेमध्ये बक्षीस निश्‍चित झाले असून कितवा क्रमांक मिळणार हे शनिवारी स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version