| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत पोलीस ठाण्याच्यावतीने कर्जत नगरपरिषद हद्दीत रूट मार्च काढण्यात आला होता. दि.24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी कर्जत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने पोलीस मैदान कर्जत येथे दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली. त्यानंतर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्याकरिता तसेच कर्जत नगरपरिषद निवडणूक भयमुक्त वातावरणात शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने कर्जत पोलीस ठाणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, कर्जत नगरपरिषद, पाटील आळी, डेक्कन जिमखाना, जकात नाका, कर्जत मुख्य बाजारपेठ, श्री कपालेश्वर मंदिर, महावीर पेठ, आमराई नाका ते कर्जत पोलीस ठाणे असा रूटमार्च काढण्यात आला होता. सदर दंगा काबू योजना व रूट मार्चकरिता कर्जत पोलीस ठाणेकडील 6 अधिकारी 15 पोलीस अंमलदार, तसेच आर सी पी प्लाटून कर्जतचे 1 अधिकारी 18 पोलीस अंमलदार उपस्थित होते.







