विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन
| कर्जत | वार्ताहर |
कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील शालेय विद्यार्थी सुरक्षा अनुषंघाने कर्जत येथील डोणे शाळा व शारदा मंदिर शाळांना भेट देऊन तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले.
कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक सोनाली घोलप, महिला पोलीस शिपाई सुजाता पाटील, महिला पोलीस शिपाई स्वाती चिरमे, महिला पोलीस शिपाई पूनम डोमे उपस्थित होते. शाळेत येणारे विद्यार्थी हे खाजगी वाहनाने प्रवास करणार नाहीत याची दक्षता घ्यावी, मुलींचे सुरक्षे करिता शासनाच्या परिपत्रकानुसार उपाययोजना कराव्यात, मुलींकडे महिला शिक्षक यांनी नियमित पणे त्यांना कोणी त्रास देतोय का, कोण तुमचा पाठलाग करतोय का याची विचारणा करावी, शाळेच्या आवारात सुरक्षेकरिता सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, मुलांचे स्वछतागृह नियमित चेक करावेत व ते स्वछ राहतील याची काळजी घेऊन ते सुरक्षित आहेत याची दक्षता घ्यावी, मुलांना घेऊन येणारे वाहन चालक यांची संपूर्ण माहिती घेणे व त्यांना मुलांचे सुरक्षा विषयक सूचना वेळोवेळी कराव्यात.
5 वी ते 7 वी चे विद्यार्थी यांच्यासोबत मैत्रीपूर्ण प्रश्नोत्तरी स्वरूपात गप्पा मारून गुड टच बॅड टच, अनोळखी व्यक्तींकडून चॉकलेट घेऊ नये, त्यांच्यासोबत कोठेही जाऊ येऊ नये, नेहमी आई-वडील, दादा-ताई यांच्या सोबतच शाळेत यावे व जावे अशा सूचना यावेळी दिल्या.