कर्जत | वार्ताहर |
कर्जत-खालापूर अशा दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या कर्जत प्रांत कार्यालयात प्रांत अधिकारी म्हणून अजित नैराळे यांची नियुक्ती झाली आहे. कर्जत प्रांत अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांची ठाणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण येथे बदली झाल्याने भांडुप येथील उपजिल्हाधिकारी अतिक्रमण निष्काषण म्हणून पदावर असलेले अजित नैराळे यांची कर्जतच्या प्रांत अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.







