कर्जत नदीघाट स्वच्छता मोहीम

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीचे पावित्र्य राखण्यासाठी कर्जत नगरपरिषदमधील स्वीकृत नगरसेवक ॲड. रोहित ओसवाल यांनी पुढाकार घेतला आहे. नदी स्वच्छता मोहीमचे कार्यकर्ते असलेल्या ॲड. ओसवाल यांनी संत निरंकारी मिशन यांच्या माध्यमातून नदीघाट परिसरात स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करून घेतला.

जलसंवर्धन मोहीम हाती घेतलेल्या संत निरंकारी मिशनकडून प्रोजेक्ट अमृत राबविण्यात येत आहे. स्वच्छ पाणी आणि स्वच्छ मन या ध्येयाने संत निरंकारी मिशन काम करीत असून या संस्थेचे सचिव जोगिंदर सुखिया यांनी देशात प्रोजेक्ट अमृत राबविण्याचा निर्धार केला आहे. या मोहिमेअंतर्गत कर्जत शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीचा परिसर स्वच्छ करण्याची मोहीम संत निरंकारी मिशनकडून हाती घेण्यात आली. कर्जत शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदी परिसरात असलेले इमारतीत राहणारे कर्जत नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक ॲड. रोहित ओसवाल यांनी संत निरंकारी मिशनला सर्व सहकार्य करण्याचे प्रयत्न केले. संत निरंकारी मिशनचे असंख्य उल्हास नदी परिसरात घाट स्वच्छ करण्यात उतरले आणि काही तासात घाट परिसर स्वच्छ झाला. नद्या, तलाव, विहिरी आणि नैसर्गिक झरे यांचे संवर्धन करण्यासाठी मिशनकडून कार्य सुरू आहे.

या स्वच्छता मोहिमेत काही ट्रॅक्टरचे ट्रॉली भरून कचरा नदीच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आली. तसेच, घाटात वेगवेगळ्या प्रकारचा साचून राहिलेल्या कचऱ्याचे संकलन देखील करण्यात आले. त्या ठिकाणी असलेल्या कचरा कुंड्या कचऱ्याने भरून गेल्या होत्या आणि त्यामुळे दुर्गंधी देखील पसरली होती. मात्र ही मोहीम राबविताना परिसर दुर्गंधी मुक्त होईल, याकडे देखील संत निरंकारी मिशनकडून लक्ष देण्यात आले. तर ओसवाल यांच्या या कार्यपद्धतीचे कर्जत शहरात कौतुक होत आहे.

Exit mobile version