कर्जत तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीचा पोटनिवडणूक निकाल जाहीर

। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीच्या 15 जागांसाठी पोटनिवडणूका जाहीर झाल्या होत्या. यामधील 4 ग्रामपंचायतीच्या जागा बिनविरोध झाल्या. 2 ग्रामपंचायतीच्या जागेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल झाली नाहीत तर 3 ग्रामपंचायती 4 जागांपैकी 3 जागांसाठी मंगळवारी (दि.21) मतदान झाले होते. त्यांची मतमोजणी बुधवारी (दि.23) संपन्न झाली.कर्जत तालुक्यातील हुमगाव 1 जागा, वेणगाव 1 जागा, भालीवडी 6 जागा, सावळे 2 जागा, माणगाव तर्फे वरेडी 1 जागा, बीड 1 जागा, नांदगाव 1 जागा, दहिवली तर्फे वरेडी 1 जागा आणि वदप 1जागा अश्या 9 ग्रामपंचायतीच्या 15 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता.

माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायत प्रभाग 4 नयना संदीप गायकवाड विजयी, वदप ग्रामपंचायत प्रभाग 2 मध्ये कल्याणी कैलास पोटे विजयी झाल्या आहेत. तर भालीवडी ग्रामपंचायत 6 जागांसाठी प्रभाग 1 मध्ये दिपक वसंत कार्ले, प्रभाग 2 नंदिनी नंदू माळी, प्रभाग 3 समीर रामदास ठाकरे व प्रतिका रमेश कटके, प्रभाग 4 आशा राजेश कर्णूक व राजेश तुळशीराम शेळके, बीड ग्रामपंचायत प्रभाग 2 हेमंत वासुदेव घरत, नांदगाव ग्रामपंचायत प्रभाग 2 देविदास हरी केवारी, दहीवली तर्फे वरेडी ग्रामपंचायत प्रभाग-2 ज्योत्स्ना किसन जामघरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. हुमगाव ग्रामपंचायत मध्ये प्रभाग 1 साठी अनुसुचित जमातीसाठी निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. तर वेणगाव ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक आठ महिन्यांनी होणार असल्याने प्रभाग 4 मध्ये निवडणूक नामनिर्देशन पत्र कोणीच दाखल केली नाही. सावळे ग्रामपंचायत मध्ये प्रभाग- 1मध्ये एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग होती मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आरक्षण रद्द झाल्याने या जागेसाठी 28 डिसेंबर पासून नामनिर्देश पत्र दाखल करण्याचे सुरू होणार आहे. यावेळी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.एच.जाधव, अभिजित खैरे, डी.पी.राठोड यांनी काम पाहिले.

Exit mobile version