कर्जत तालुका वकील संघटनेचे अ‍ॅड. प्रविण खडे अध्यक्ष

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत दिवाणी न्यायालयातील कर्जत तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.प्रविण खडे यांची निवड करण्यात आली. संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.

संघटनेचे मावळते अध्यक्ष अ‍ॅड.सी.बी.ओसवाल यांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर नवीन अध्यक्ष निवडीकरीता इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. अ‍ॅड. प्रविण शांताराम खडे यांचे व्यतिरिक्त अन्य कोणीही अध्यक्षपदाकरीता इच्छुक नसल्याने त्यांची कर्जत तालुका वकिल संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. अ‍ॅड. अनिल पाटील यांची उपाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली.

अध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अ‍ॅड. दीपक गायकवाड यांनी महत्वाची भूमिका बजावली. यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. सतिश डायरे तसेच संघटनेचे माजी पदाधिकारी अ‍ॅड.अमोल सूर्यवंशी व संघटनेचे सभासद अ‍ॅड. शैलेश पवार, अ‍ॅड. वसंत रवणे, अ‍ॅड. शिल्पी परदेशी, अ‍ॅड. रूपेश पाटील, अ‍ॅड. ऋषिकेश कांबळे, अ‍ॅड. जयेश म्हसे, अ‍ॅड. शरद सावंत, अ‍ॅड. भारत सावंत, अ‍ॅड. गितेश सावंत, अ‍ॅड. थोरवे, व इतर वकील सभासद हजर होते. मावळते अध्यक्ष अ‍ॅड. सी. बी. ओसवाल यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करुन कार्यभार त्यांचेकडे सोपवला. सर्वांनी नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version