। कर्जत । वार्ताहर ।
श्री दत्त जयंती निमित्त विठ्ठलनगरमधील यशोदत्तमध्ये असलेल्या श्री दत्त मंदिरात जन्म सोहळा झाल्यानंतर रात्री संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. कर्जतमधील उष:काल मराठी वाद्यवृंदच्या कलाकारांनी गीते सादर करून कर्जतकरांना मंत्रमुग्ध केले.
एकापेक्षा एक सरस गीते आनंद कुलकर्णी, मिहीर दुसाने, स्नेहा गोगटे, श्रीरंग वैद्य, आरती भालेराव या गायकांनी सादर केली. त्यांना ढोलकीवर धनंजय बेडेकर, केतन गडकरी, तबल्यावर कौशिक वांजळे, हार्मोनियमवर सुयोग ओक, ताल वाद्यावर संतोष माडगूळकर, उज्वल शिंदे यांनी साथ संगत दिली. सूत्रसंचालन प्रसिध्द अभिनेत्री जुई गडकरी यांनी केले. याप्रसंगी सुधीर पुराणिक, प्रकाश पटवर्धन, दिलीप गडकरी, शरद सरोदे, आशा गडकरी, मिता कारखानीस, नेत्रा गडकरी, विशाल गोरेगावकर, स्वप्ना अय्यर, सीमा गडकरी आदींसह कर्जतकर उपस्थित होते.
‘उष:काल संगीत रजनी’ने कर्जतकर मंत्रमुग्ध

Oplus_131072