कशेळे रुग्णालयाला मिळाले डॉक्टर

अनेक वर्षांपासून रिक्त पदांची भरती
राज्य शासनाकडून दखल

। नेरळ। वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेसाठी कशेळे येथे ग्रामीण रुग्णालय आहे. त्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांची पदे अनेक वर्षे रिक्त होती. त्यासाठी आदिवासी ठाकूर समाज सेवा या संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मनोहर पादीर यांनी थेट मानवी हक्क आयोगाकडे याचिका दाखल केली होती. दरम्यान, मनोहर पादीर यांच्या मागणीनंतर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने कशेळे ग्रामीण रुग्णालयातील अनेक वर्षे रिक्त असलेली वैद्यकीय अधिकारी यांची पदे भरण्यात आली आली आहेत.

आदिवासी भागातील आरोग्य यंत्रणेच्या व्यवस्थेसाठी कशेळे ग्रामीण रुग्णालय कशेळे ग्रामीण रुग्णालयातील विविध वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे तसेच अनेक आरोग्य सुविधा यांच्याबाबत आदिवासी समाजाचे कार्यकर्ते आणि आदिवासी ठाकूर समाज सेवा संघाचे राज्य अध्यक्ष मनोहर पादीर यांनी राज्याच्या मानवी हक्क आयोगाकडे धाव घेत याचिका दाखल केली. पादीर यांनी आपल्या याचिकेत कशेळे ग्रामीण रुग्णालयात प्रसूती स्री रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ तसेच फिजिशियन सर्जन आणि वैद्यकीय अधीक्षक यांची पदे रिक्त असल्याने स्थानिक आदिवासी लोकांना आरोग्य सेवा मिळत नसल्याची तक्रार केली होती. तर, या रुग्णालयात ब्लड बँक असावी, सोनोग्राफी मशीन, एम.आर.आय मशीन कार्यरत असावे आदी मागण्यांबाबत आवाज उठविला होता.

मनोहर पादीर यांच्या याचिकेवर मानवी हक्क आयोगाच्या न्यायालयात सुनावणी झाली असता कर्जत गतालुक्यातील कशेळे ग्रामीण रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकारी यांची पदे तात्काळ भरण्यात आली आहेत. तर, पुढील आठ दिवसात ग्रामीण रुग्णालयात होणारे सर्व उपचार या ठिकाणी होतील, असे आश्‍वासन आयोगाने दिले आहे. कशेळे ग्रामीण रुग्णालयात स्त्री रोगतज्ज्ञ म्हणून डॉ. पाटील या हजर झाल्या असून, बालरोग तज्ज्ञ म्हणून डॉ. प्रतीक झेंडे हजर झाले असून, त्यांनी कामकाजाला सुरुवात केली असल्याची माहिती याचिकाकर्ते मनोहर पादीर यांनी दिली आहे.

Exit mobile version