लाचखोर मंडल अधिकार्‍यास अटक

। कर्जत । प्रतिनिधी ।
कशेळे मंडल अधिकारी याला 7 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे अधिकृत रिकव्हरी एजंट यांनी बँकेकडून सील करण्याकरिता कशेळे येथील मंडल अधिकार्‍यांकडे गेले असता त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यापैकी काही रक्कम स्वीकारताना मंडल अधिकार्‍याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाण्याच्या पोलीस निरिक्षकांनी केली.

स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे अधिकृत रिकव्हरी एजंट हे रो हाऊस नंबर 63, बी इलेजंट फेज -1, इलेजंट कॉम्प्लेक्स, प्लॉट नंबर 193, नवीन 262 हा स्टेट बँके कडून सील करण्याकरिता न्यायालयाने आदेश दिला कारणाने कशेळे येथील मंडल अधिकारी दिनेश रमाकांत गुजराथी यांच्याकडे गेले असता त्यांच्याकडे सदरचा रो हाऊस सील करण्यासाठी 15 हजार रुपयांची मागणी केली होती.

याबाबत त्या तक्रारदाराने ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाकडे तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने 31 ऑक्टोबर 2022 रोजी केलेल्या पडताळणी कारवाईत गुजराथी यांनी 15 हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती 10 हजार रुपये मागणी केल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश गणपत चोपडे यांनी सापळा रचून ठरलेल्या 10 हजार रुपयांपैकी सात हजार रुपयांची रक्कम तक्रारदारांकडून स्वीकारताना रंगेहात पकडले.

Exit mobile version