| कोर्लइ | वार्ताहर |
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती सेवा पंधरवाडा निमित्ताने स्वच्छता ही सेवा ब्रीदवाक्य घेऊन संपूर्ण देशात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून त्याचाच भाग भारतीय मत्स्य सर्वेक्षण संस्था (मुंबई) यांच्यातर्फे संस्थेचे महासंचालक डॉ. आर. जयभास्करन् यांच्या मार्गदर्शनाखाली उपमहासंचालक डॉ. महेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात येऊन मुरुड तालुक्यातील काशिद-बिच समुद्र किनाऱा चकाचक करण्यात आला.
भारतीय मत्स्य सर्वेक्षण संस्थेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमार्फत मुंबई, गोवा, केरळ, तामीळनाडू, आंध्रप्रदेश, अंदमान-निकोबार द्विपसमूहातील क्षेत्रात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भारतीय मत्स्य सर्वेक्षण संस्थेचे उपमहासंचालक डॉ. महेश कुमार फरेजिया, तंत्र विश्लेषक रमण मुर्ती, वरीष्ठ मत्स्य वैज्ञानिक अशोक कदम, बापू राऊत, आशिष कुमार, माजी कर्मचारी अविनाश चौलकर, काशिद ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच नम्रता कासार-खेडेकर, कर्मचारी वृंद विशेष करून माध्यमिक विद्यालय काशिदचे विद्यार्थी या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.