पावसाळ्यात काशिद समुद्रकिनारा बंद

पर्यटकांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

। कोर्लई । वार्ताहर ।

मुरुड तालुक्यातील काशिद समुद्रकिनारा पावसाळ्यात दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आला असून तसे रस्त्यालगत सुचना फलक लावण्यात आले आहेत. यादरम्यान, काशिद समुद्रकिनार्‍यावरील विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स दि.18 जून ते दि.14 ऑगस्ट या कालावधीत बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच, याठिकाणी असलेल्या स्पिडबोट, बनाना बोट, पॅरोसेलिंग बोट मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंद करण्यात आल्या आहेत. या कालावधीत येथे सुचना फलकावरील सुचनांचे पालन करुन पर्यटकांनी पोहण्यासाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन पोलीस, ग्रामपंचायत, ग्रामस्थ तसेच स्टॉल्स धारकांतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version