| अलिबाग | प्रतिनिधी |
दत्त अवधूत एन्टरटेन्मेन्ट निर्मित, अनंत थिएटर या संस्थेच्या ‘विठ्ठल विठ्ठल’ या नाटकाचा 25वा रौप्य महोत्सवी प्रयोग सिंधदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील उत्तर वाडा तांबळडेग श्री देव महापुरुष रंगमंचावर सादर झाला. या नाटकाची निर्मिती कौस्तुभ विलास भिडे यांनी केली. तर, नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक राजन पांचाळ हे आहेत. तसेच, सह दिग्दर्शक म्हणून डॉ. जुईली टेमकर यांनी काम केले आहे. त्याचबरोबर नेपथ्य तुषार पाटील, प्रमोद पाटील, शैलेश मेस्त्री, देवेंद्र पाटील, प्रकाश योजना मिलन पाटील. संगीत आणि गायक राजेंद्र म्हात्रे, पार्श्वसंगीत विक्रांत वार्डे व रंजन जाधव, रंगभुषा हितेश पवार, वेशभुषा रश्मी पांचाळ, सूत्रधार देवेंद्र केळूसकर, रंगमंच व्यवस्था उपासना घोसाळकर व तुषार पाटील आणि व्यवस्थापन प्रतिक पानकर यांनी केले. तर, या नाटकात राजु गुरव, राजन पांचाळ, साधना माळी, डॉ.जुईली टेमकर, योगेश पवार, परेश ठाकूर, सुनिल बूरुमकर, प्रमोद पाटील, विजय म्हात्रे, जितेंद्र पाटील, तुषार पाटील, देवेंद्र केळूसकर, उपसना घोसाळकर, बालकलाकार विरा नरबेकर या कलाकारांनी या नाटकात भुमिका केल्या. दरम्यान, नाटकाच्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात दाद दिली आणि कलाकारांची वाहवा केली.







