| वाघ्रण | वार्ताहर |
वाघ्रण विविध विकास कार्यकारी सोसायटीचे सेवानिवृत्त सेक्रेटरी काशिनाथ गणपत माळी यांचे वयाच्या 78 व्या वर्षी गुरुवारी (दि. 3) अल्पशा आजाराने पेण तालुक्यातील उंबर्डे येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. वाघ्रण वि.वि.का.सो. शेती संस्थेचे ते 27 वर्ष सेक्रेटरी होते. तसेच, शहापूर सोसायटीचा प्रभारी कार्यभार त्यांनी सांभळला होता. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार, दि. 4 एप्रिल रोजी उंबर्डे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. काशिनाथ माळी यांच्या पश्चात पत्नी अन्नपूर्णा, मुले विजय आणि नवीन, दोन विवाहित मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.