। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील नागोठणे विभाग क्रिकेट असो.च्या मान्यतेने तळवली तर्फे अष्टमी आदिवासीवाडी युवक मंडळाच्यावतीने संपन्न करण्यात आलेल्या मर्यादित क्रिकेट स्पर्धेत कासू ‘ब’ हा संघ अंतिम विजेता ठरला आहे.
स्पर्धेचे उद्घाटन मधुकर पवार, दिनकर महाडिक, प्रणव मरवडे व मनोज बामणे आदींच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेतील अंतिम सामन्यात कासू ‘ब’ संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला असून चिकणी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. तर, पाटणसई व कासू ‘अ’ या दोन्ही संघांना अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. विजेत्या संघांना मधुकर पवार व वसंत पवार यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तर, स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी तळवली तर्फे अष्टमी आदिवासी युवक मंडळाने मोलाचे सहकार्य केले.






