कबड्डी स्पर्धेत कातळावाडी संघाची मोहोर

ढेपावाडी संघ ठरला उपविजेता

| सुकेळी | वार्ताहर |

नागोठणेजवळच असलेल्या सुकेळी येथील जय हनुमान क्रीडा मंडळ वेताळवाडी यांच्यातर्फे आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत जय गावदेवी कातळावाडी या संघाने जय बापदेव ढेपावाडी या संघावर मात करीत कै. नारायण सुटे स्मृतिचषक पटकाविला.

या स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विभागातील राष्ट्रवादीचे नेते शिवराम शिंदे, विभागीय अध्यक्ष संतोष कोळी, निवास पवार, सतीश सुटे, दिपेंद्र आवाद, संतोष झोलगे, राजेंद्र शिंदे, अशोक कापसे, विनय गोळे, अमित जांबेकर, राहुल झोलगे तसेच वेताळवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातून जवळपास 60 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या जय गावदेवी कातळावाडी या संघास रोख रक्कम रु.10,000 व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तर उपविजेत्या जय बापदेव संघ ढेपावाडी यांना रु.7,000 व चषक देण्यात आला. तसेच तृतिय व चतुर्थ क्रंमाक अनुक्रमे जय हनुमान हेदोशी व जय भवानी घोडगाव या संघास देण्यात आले. त्याचप्रमाणे उत्कृष्ट चढाई कातळावाडी संघाचा अरविंद हंबीर, उत्कृष्ट पक्कड ढेपावाडी संघाचा उमेश पारधी तर षब्लिक हिरो अरविंद हंबीर यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

या बक्षिस वितरण कार्यक्रमाला ऐनघर विभाग ग्रामीण बेरोजगार संघटनेचे उपाध्यक्ष सतिश सुटे, युवा नेते निवासशेठ पवार, सामाजिक कार्यकर्ते अशोक कापसे, राहुल झोलगे, माजी सदस्य अंबाजी शिद, काशिराम वारगुडे, मालु शिद, मधुकर हंबीर, परशुराम वारगुडे, रमेश वारगुडे, धर्मा वारगुडे, येसुराम वारगुडे, मंगेश हंबीर, राजु वारगुडे, महेश निरगुडे, अजय शिद, अनिल वारगुडे, संजय शिद तसेच जय हनुमान क्रिडा मंडळाचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version