कविता पाटील सेवानिवृत्त

| कोर्लई | वार्ताहर |

कोकण एज्युकेशन सोसायटीच्या अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील स.रा. तेंडुलकर विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका कविता कृष्णा पाटील ह्या आपली 39 वर्ष 6 महिने उत्तम प्रकारे सेवा करुन सेवानिवृत्त झाल्या. अलिबागमधील सुप्रसिद्ध वकील अ‍ॅड. के.डी.पाटील यांच्या त्या सौभाग्यवती होत.

को.ए.सो. संस्थेच्या भिलजी बोरघर हायस्कूल या शाळेत सहाय्यक शिक्षिका म्हणून कविता पाटील दि.23 जुलै 1984 रोजी आपल्या सेवेत रुजू झाल्या. त्यानंतर बामणगाव हायस्कूल, कन्या शाळा अलिबाग, रानडे हायस्कूल थळ, रेवदंडा हायसकूल येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून सेवा बाजावून त्या सेवानिवृत्त झाल्या.

रेवदंडा हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात कविता पाटील यांना शालेय समिती चेअरमन सरोज वरसोलकर, मुख्याध्यापिका वर्षा माने, शरयु कारखानीस, संदीप खोत, मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच पुढील यशस्वी कारकीर्दीसाठी व उदंड आयुष्य लाभण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अनिल, प्रशांत, प्रणव, शिवानी, नेहा, आदित, सिता पाटील कुटुंबिय तसेच शालेय समिती सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version