कविता ठाकूर यांना पीएच.डी.

अलिबाग । प्रतिनिधी ।

मुंबई बी. एड कॉलेज फॉर वूमेन वडाळामध्ये प्रभारी प्राचार्या पदावर कार्यरत असलेल्या कविता संदेश ठाकूर यांना नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हयांच्या हस्ते गोंडवाना विद्यापीठातून पीएचडी पदवी प्रदान केली. कविता ठाकूर यांनी मुंबई शहर आणि उपनगरातील शिक्षकांच्या नोकरी समाधाचा आणि त्यासाठी प्रेरणा तंत्राचा अभ्यास करणे या विषयावर संशोधन केले. डॉ. राजेश पत्तीवार यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

डॉ. कविता ठाकूर यांना सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर असे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान झाले आहेत. त्यांनी राष्ट्रीय अपंग संघासाठी महिला अध्यक्ष म्हणून कार्य केलेले आहे. आतापर्यंत डॉ. कविता ठाकूर यांनी राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये स्वतःचे अठरा पेपर आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी सहा पेपर प्रसिद्ध झाले आहेत. बी.एड अभ्यासकमावर आधारित समकालीन भारत आणि शिक्षण तसेच आधुनिक भारतीय समाजाचे शिक्षण ही पुस्तके लिहिली आहेत. त्यांना डॉक्टरेट मिळाल्यामुळे विविध स्तरावरून त्यांचे अभिनंदन केले.

Exit mobile version