। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर दिवाणी न्यायालय येथे 9 सप्टेंबर रोजी लोक अदालत आयोजित करण्यात आली होती, त्यात 1361 प्रकरणाचा कायम निकाल करून 5,27,46,195 रूपयांची वसुली करण्यात आली.
खालापूर येथील न्यायालय त लोक अदालत पार पडली असता यामध्ये 968 क्रिमिनल प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी 82 प्रकरणे निकाली निघाली. तर 6792 वाद पूर्व प्रकरणापैकी 1279 निकाली निघाली असून एकूण वसुली 5,27,46,195 करण्यात आली आहे. तर कक्ष क्र.1 चे दिवाणी व फौजदारी प्रकरणे यांचे काम श्रीमती एम.के.सकपाल तर पक्ष क्र.2 चे वाद पूर्व प्रकरणे याचे काम दिवाणी न्यायाधीश क स्तर खालापूर, आर.डी वाबळे यांनी पाहिले.
तसेच लोक अदालतमध्ये पंच म्हणून ॲड.मिलिंद गायकवाड व ॲड.सुरेखा धनराज यांनी भूमिका बजावली असून सदर लोक अदालत यशस्वी होण्याकरता बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.सचिन चालके सह सर्व कमिटी सदस्य व वकील वर्ग, न्यायालय कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतल्याचे पाहायला मिळाले. तर न्यायालयाच्या वतीने दिनेश राठोड यांनी व्यवस्थापनाची कामे पाहिली.